Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मासा

श्रीमती वसुधा दुनाखे

मासा
ND
मासेभाऊ मासेभाऊ कसा राहतो पाण्यात
तुम्हार लाभले नाना आकार, अन दिसता नाना रंगात।
चपळ हालचाली तुमच्या, पाण्यात न बुडता
पाण्यामध्येच राहून श्वास कसा घेता।।
तुमचं आपलं बरं आहे, ना शाळा ना अभ्यास
हे आणा ते आणा कशाचाच नाही पाठी त्रास।।
मग तुम्ही खाता काय, का नुसता पाणीच पिता
तरीही पाण्यामध्ये तुम्ही किती कसरती करता।।
पाण्यातच झोप तरी कधी व केव्हा घेता
का खाद्य शोधण्यातच सारा वेळ घालवता।।

साभार : अनुपुष्‍प पुस्तक

Share this Story:

Follow Webdunia marathi