Select Your Language
वाढदिवस
जयश्री संभाजीराव घुले
आई तू ऐकतेस ना ? मला, थोडे पैसे देना ।आज वाढदिवस ना माझाखायचाय मला पिझ्झा ।। सगळे मित्र येणारएकत्र सारे जाणार । सगळे पिझ्झा खाणारमज्जा, मज्जा करणार ।।नको राजा खाऊ पिझ्झाउद्या पोट दुखल ना राजा ।घरीच करू साजराबाळा वाढदिवस तुझा ।। गुलाबजाम, बासुंदीपुरी भाजी, कांदा भजी ।खासा बेत जेवणाचासुंदर काढू रांगोळ्या ।। ताई तुला ओवाळेलऔक्षण मी करेन ।हात जोडून, देवालाउदंड आयुष्य मागेन ।।