झाडे लावा, झाडे जगवा

मंगळवार, 26 मार्च 2019 (16:03 IST)
झुक झुक झुक झुक आगीनगाडी
पाण्याचे डबे आणून सोडी
वाळकी झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या
 
मामाचा गाव मोठा
पाण्याचा लय तोटा  
हंडा रांगेत लावु या  
मामाच्या गावाला जाऊ या
 
मामाची बायको सुगरण
पाण्यासाठी फिरते वणवण
बिनआंघोळीचे राहू या
मामाच्या गावाला जाऊ या
 
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठून आलीत ही कार्टी
पाण्यासाठी भांडु या
मामाच्या गावाला जाऊ या
 
मामा मोठा तालेवार
आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार
कोरड्या पाण्याने न्हाऊ या
मामाच्या गावाला जाऊ या 
 
झाडे लावा, झाडे जगवा

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले असेल तर या नॅचरल ड्रिंक्‍सने बॉडीला करा डिटॉक्‍स