Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एका वेळी दहा दशलक्ष रंग पाहतात डोळे

एका वेळी दहा दशलक्ष रंग पाहतात डोळे
जगात खूप काही रंजक आणि कुतहूलजन्य आहे. चला, अशीच काही माहिती घेऊ.
* आपले डोळे एका वेळी दहा दशलक्ष रंग पाहू शकतात.

* खेळताना वापरल्या जाणार्‍या फाशाच्या विरुद्ध बाजूच्या अंकांची बेरी नेहमी सात असते. फासा काढून बघा.
 
* चित्ता तासाला 76 किलोमीटर अंतर पार करू शकतो. तो एवढ्या प्रचंड वेगानं धावतो. दुसरीकडे जलद धावणारी

* माणसं तासाला 30 किलोमीटरचं अंतर पार करू शकतात.

* गोलियाथ हा जगातला सर्वात मोठा बेडूक आहे. हा गोड्या पाण्याजवळ अंडी घालतो. अंटार्टिका सोडून प्रत्येक

* खंडात या बेडकाचं अस्तित्व असतं.

* कांगारूंच्या 50 पेक्षा जास्त प्रजाती आहेत.

* जगातली 10 टक्के माणसं डावखुरी आहेत.

* झेब्राचा मूळ रंग पांढरा असतो. त्याच्या अंगावर काळे पट्टे असतात.

* हिप्पोपोटॅमस पाण्याखालीच पिलांना जन्म देतात. पिलांची जडणधडणही पाण्याखालीच होते. प्राणवायू मिळवण्यासाठी ही पिलं डोकं पाण्यातून बाहेर काढतात.

* आपण डाव्या नाकपुडीपेक्षा जास्त उजव्या नाकपुडीनं जास्त चांगल्या प्रकारे वास घेऊ शकतो.

* नुकत्याच जन्मलेल्या बाळाला रंग कळत नाहीत.

* वटवाघूळ एका रात्रीत 3 हजार किडे खाऊ शकतं.

* नेपच्यून या ग्रहावरचं एक वर्ष म्हणजे पृथ्वीवरची 165 वर्षे.

* बुध ग्रहाचा बराचसा भाग लोहापासून बनला आहे.

* पृथ्वीला एकच चंद्रा आहे पण गुरू ग्रहाला 63 चंद्र म्हणजेच उपग्रह आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओठांचा काळपटपणा दूर करण्यासाठी सोपे उपाय