Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोरी गोरीपान, फुलासारखी छान

Gori Gori pan fulasarkhi chan lyrics
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण
 
गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण !
 
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !
 
वहिनीशी गट्टि होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान !
 
-ग. दि. माडगूळकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Reduce Wrinkles किचनमध्ये ठेवलेल्या या गोष्टींनी सुरकुत्या आणि डाग दूर करा