एक होती तारामती
तिला डाळिंबे फार आवडत
तिच्या आईने अंगणात एक डाळिंबाचे झाड लावले.
झाड लहान होते
तारामती झाडाला दररोज पाणी घाली
ते झाड हळूहळू मोठे झाले
एके दिवशी तिला एक फूल दिसले
तिला फार आनंद झाला
तिने ते आईला दाखवले
आई म्हणाली,
'आता काही दिवसांनी डाळिंब येईल.
तू दररोज पाणी घाल हं.'
झाडावर आणखी खूप फुले आली
हळूहळू डाळिंबे पण दिसू लागली
एकदा तारामतीने आईला विचारले,
'आई मी एक डाळिंब काढू का?'
आईने सांगितले,
'जरा थांब, आणखी थोडे दिवस वाट पाहा.'
आणखी काही दिवस गेले
आईला दो तयार डाळिंबे दिसली
ती खूप मोठी होती
ती आईने काढली
मग एक फोडून तिने तारामतीला दाणे दिले.
तारामती म्हणाली
'आई, आई, किती गोड आहे हे डाळिंब?'
'आपल्या शेजारची यमू आजारी आहे
ती काल आईजवळ डाळिंब मागत होती.
आपली डाळिंबे गोड आहेत
आई, हे डाळिंब मी यमूला देऊ का!
तिला ते फार आवडेल.
आणि ती लवकर बरी होईल'
हे ऐकून आईला समाधान वाटले
तिने ते डाळिंब तारामतीला दिले
मग तारामतीने ते यमूला दिले
दाणे खाताना यमूला फार आनंद वाटला.