Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कणा

कणा
ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
 
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
 
माहरेवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळया हाती जाईल कशी बायको मात वाचली
 
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद महणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
 
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
‍चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे
 
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला
 
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक लढ महणा!
 
- कुसुमाग्रज

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Punjabi Dhaba : फणस भाजी