Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजपासून मुलांनी फुलणार शाळा, सुटीची धमाल संपली, आता शाळा सुरु

आजपासून मुलांनी फुलणार शाळा, सुटीची धमाल संपली, आता शाळा सुरु
सोलापूर , सोमवार, 16 जून 2014 (11:00 IST)
नवे वर्ग.. नवे मित्र.. नवा अभ्यास.. नवी आशा.. नवा ध्यास घेतलेली बच्चेकंपनी नव्या अभ्यासक्रमाला आज (सोमवारी) सामोरी जाणार आहे. गतवर्षीप्रमाणे शाळेत फुले व गोड पदार्थ देऊन मुलांचे स्वागत केले जाणार आहे. शाळांचा परिसर पुन्हा एकदा गजबजणार आहे. 
 
शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी रविवारी बाजारपेठा पालक आणि विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. पप्पा, मला कार्टूनचेच दप्तर, खाऊचा डबा अन् वह्या पाहिजेत, अशी विनवणी पाल्य करताना दिसत होते. यंदा बाजारपेठेत वह्या, दप्तर, वॉटरबॅग, खाऊच्या डब्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. 
 
विद्यार्थ्यांचे नव्या शैक्षणिक सत्रामध्ये जल्लोषात स्वागत करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळांनी पूर्ण तयारी केली आहे. यंदा शैक्षणिक अभ्यासक्रमाची पुस्तकेही उपलब्ध झाली असून, नव्या निकषाप्रमाणे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी शिक्षकवर्गदेखील पूर्ण तयारीनिशी सज्ज झाला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील शिक्षकांनी रविवारी शाळेत दाखल होऊन मुलांच्या स्वागताच्या पूर्व तारीचा आढावा घेतला. शिक्षक आणि मुखधपकांप्रमाणेच सरकारी अधिकारीही सोमवारी मुलांच्या स्वागताला हजर राहणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi