फार दिवसांनी आले दारी माझ्या ऊन
कोंदलेल्या आभाळाचे लख्ख झाले मन-
फारा दिवसांनी आली दारात किरणे
टुडटुडणारी जशी नाजूक पावले-
ऊन येते मांजराच्या चोर पावलांनी
बाळ लागे धरू त्याला इवल्या हातांनी -
कोवळ्याशा उन्हामध्ये हुंदडती बाळे
हसताना चमकल फुलांचेही डोळे -
अंगाअंगातून वाजे सतारीचे बोल
आनंद तरंग किती उमटती खोल -
- अंजली