एक होती तारामतीतिला डाळिंबे फार आवडततिच्या आईने अंगणात एक डाळिंबाचे झाड लावले.झाड लहान होतेतारामती झाडाला दररोज पाणी घालीते झाड हळूहळू मोठे झालेएके दिवशी तिला एक फूल दिसलेतिला फार आनंद झालातिने ते आईला दाखवलेआई म्हणाली,'
आता काही दिवसांनी डाळिंब येईल.तू दररोज पाणी घाल हं.'झाडावर आणखी खूप फुले आली
हळूहळू डाळिंबे पण दिसू लागली
एकदा तारामतीने आईला विचारले,
'आई मी एक डाळिंब काढू का?'
आईने सांगितले,
'जरा थांब, आणखी थोडे दिवस वाट पाहा.'
आणखी काही दिवस गेले
आईला दो तयार डाळिंबे दिसली
ती खूप मोठी होती
ती आईने काढली
मग एक फोडून तिने तारामतीला दाणे दिले.
तारामती म्हणाली
'आई, आई, किती गोड आहे हे डाळिंब?'
'आपल्या शेजारची यमू आजारी आहे
ती काल आईजवळ डाळिंब मागत होती.
आपली डाळिंबे गोड आहेत
आई, हे डाळिंब मी यमूला देऊ का!
तिला ते फार आवडेल.
आणि ती लवकर बरी होईल'
हे ऐकून आईला समाधान वाटले
तिने ते डाळिंब तारामतीला दिले
मग तारामतीने ते यमूला दिले
दाणे खाताना यमूला फार आनंद वाटला.