देवाला आली चेष्टेची लहरएक दिवस त्याने केलाच कहर
सिंह बनला गोगलगाय
उंदीर धरतो मांजराचे पाय
व्यायामशाळा काढतो कुत्रा
पद यात्रेला हत्तींची जत्रा
वाघाला भरला 'फ्यु'चा ताप
हळूच थर्मामिटर लावतो साप
माकडाने काढला इंग्रजीचा क्लास
जिराफ आणि झेब्रा हटकून पास
हुरळून गेले गाढव सुस्त
बायकोला म्हणे 'नाचतेस मस्त'.