फोना, ट्रिंग ट्रिंग वाजू नकोसआजीशी उग्गाच बोलू नकोसनाटकाला जायचं ठरवू नकोसहलीला न्यायचं नावच नकोबाबा नि आई कामाला जातातआजी नि मीच असतो घरात
आजीला नेलंस तर होईन मी एकटा
कोण सांगेल गोष्ठी?
कोण करील थट्टा?
त्याच्यापेक्षा असं कर ना
थोडं थोडं माझ्याशी बोल ना
आईसक्रीम खायचा बेत ठरव ना!
आजी नि मी दोघंह ही जाऊ
तुझ्यासाठी देखील आणू थोडा खाऊ.