पारावरच्या दवाखान्यात
आज बरीच गर्दी झाली
खारीला फार सर्दी झाली
पण, घारीने वर्दी दिली
सुतार डॉक्टर व्हिजीटला गेले
पोपट कंपाउंडर कामाला लागले
चिमणीचा दात दुखत होता
कावळाही मधूनच खोकत होता
मुंगीच्या पायाला येत होत्या मुंग्या
तिच्या सासूला होता डायबेटिस
रागावून कंपाउंडर बोलू लागले
साखर सोडली तर इंजेक्शन चालू
म्हातारे डासोपंत हिवतापाने बेजार
त्यांना झाला मलेरियाचा आजार
सेल्मसन मुंगळेदादा डॉ. कडे आले
दोन गुळाच्या ढेपी भेट देऊन गेले
वर एक माशी फ्री सोडून गेले.