आज रविवार त्यामुळे शाळेला सुट्टी
रविवारी जमली आम्हा सार्यांची गट्टी
आई म्हणाली, आज खायला वेगळे काहीतरी करु,
मी म्हणालो, कांद्याची भजी करू
घरात नाहीत म्हणून आईने आणायला
सांगितले कांदे,
आज दुकान आणि बाजार बंद त्यामुळे झाले वांदे
आता मात्र, चिडणे हा झाला बाबांचा प्रांत,
मला कळेना त्यांना कसे करावे शांत
तेवढ्यात आली गावावरून आजी
तिने येताना आणली फणसाची भाजी
बाबा म्हणाले, क्या बात है?
आई म्हणाली, ये तो माँ के हात का प्रसाद है.