आला उन्हाळा आला,येई आंब्याचा मोसमरोज घाई गोंधळ, सुरू लग्नाचा मोसमआमच्याही बाहुलीचे, ठरले आज लग्न आधीच बांधली पूजा, यायला नको विघ्न नवरीबाई सेजल, सजली मोठी छानस्वप्नात झाली गुंग, नह्वते जगाचे भाननवरदेव किरण, तेच त्याचे पसरेवर्हाडीही आहेत, गोड गोड साजरे
वरूण, निरज, आदित्य, कुश, कुणाल, राहुल,
राधिका न सई, जुई बेबी गौरी न आंचल
सगळे झाले गोळा, हौसेला नाही मोल
लग्नाची धावाधाव, एकी त्यांची अमोल
सगळे आहेत हौसी, हौस करती लटकी
पण नवरी सेजल, आहे थोटी नकटी.