एक होता जीवा तो अगदी लहान होतातो शाळेत जाऊ लागलामुलांना तो आवडेतो एके दिवशी घरी येत होताबरोबर दुसरे मुलगे होतेएक मुलाचे नाव भिवा होतेभिवाने जिवाच्या पायात पाय घातलातोच छोटा जिवा जमिनीवर पडला जिवाचे कपडे धुळीत मळलेजिवाच्या अंगला घाण लागलीमुले जिवाला हसली, पण शिवा चटकन् धावत आलाशिवाने जिवाला उचललेजिवाचे कपडे शिवाने झाडलेगुरुजी शाळेच्या दरवाज्यात उभे होतेगुरुजींनी काय झाले ते पाहिले होते
ते मुलांजवळ आले
गुरुजी भिवाला रागावले
गुरुजींनी शिवाला शाबासकी दिली
आणि म्हणाले,
'शिवा, तुला हे पैसे बक्षीस घे. याचे पेढे घेऊन खा.'