Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रावण भाज्या

- चंद्रकांत सोनवणे

श्रावण भाज्या
श्रावण महिना आला आला
पालेभाज्या घेऊ चला श्रावण
घेवड्याला मान देऊ चला
मेथी म्हणते शेपुली नंबर माझा
पहिला आला ।।1।।
पालकाची हो घाई अशी
ND
गवार मागे राहिल कशी
भेंडीशी भांडेल कोण ते?
करूनि भोपळा घाई अशी ।।2।।
कडवट लागे फार कारले?
स्पर्धा त्यासी करी दोडके
चवळी पडवळा बहीण भाऊ
ढोबळी मिरची तळुन खाऊ।।3।।
कोथिंबीरीच्या वड्या करू
अंबाडी लवणांत भरू
फुलवर कोबी वजनच फार
भरली वांगी अति चवदार.

Share this Story:

Follow Webdunia marathi