Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सहामाही परीक्षा

स्व. सौ. मीना आठल्ये

सहामाही परीक्षा
NDND
थंडीचा मोसम नोटीस आली
सहामाहीची परीक्षा आली
डायव्हर्स देण्याची वेळच आली
लाडक्या ह्या निद्रेला।।1।

कोणी परीक्षक स्वप्नात येऊन
भितीची छाया मनात पसरून
सर्व विषयात नापास करून
दुष्ट परीक्षक निघून गेला।।2।

पश्चातापें मम मन भरले
बाह्ममन मग हळूच म्हणाले
दसरा दिवाळी गणपती आले
वेळच नव्हता अभ्यासाला।।3।

webdunia
NDND
झडप घातली अंतर्मनाने
हवे कशाला उगीच बहाणे
अभ्यासाची खरी ओढ नसणे
हाच पुरावा सत्याला।।4।

क्षणभर आला विचार अचानक
डायव्हर्स द्यावा परीक्षेला तडक
परंतु घरचा कायदाही कडक
भाग परीक्षा देणे मला।।5।

आठ दिवसांत कसं तरी जागून
अभ्यास एकदाचा टाकला करून
बसले परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊन
लागते हातपाय कापायला।।6।

webdunia
NDND
आठ वाजले पेपर आले हातात
धडधड झाली अंत:करणात
नजर फिरविली दोन क्षणांत
'राशी' चांगली होती मला।।7।

तयार माझे पांचच प्रश्न धड
सोडवले तीन प्रश्नच फक्कड
चार दिवस गेले घेण्यातच गड
पाचव्या दिवशी पिक्चरला।।8।।

Share this Story:

Follow Webdunia marathi