Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्लू टेल्ड बी इटर

ब्लू टेल्ड बी इटर

वेबदुनिया

PR
हा एक लहान पक्षी असून साधारणपणे बुलबुलच्या आकाराइतका असतो. याच्या डोळ्यांच्या आजूबाजूला काजळाप्रमाणे काळ्या रेषा असतात. गळा फिक्कट भूरकट रंगाचा असतो. बाकी संपूर्ण शरीर गवतासारखे हिरवे असते. नावाप्रमाणेच त्याच्या मागील काही भाग आणि शेपूट निळ्या रंगाची असते. नर आणि मादीमध्ये फारसा फरक नसतो. छोटय़ा- छोटय़ा थव्यांनी हे पक्षी तलाव, सरोवर आणि घनदाट झाडाच्या आसपास राहातात. जवळपास संपूर्ण भारतात हा पक्षी आढळतो. मोकळी मैदाने, जंगले, नद्यांच्या आजूबाजूचा परिसर या ठिकाणी रमणारा हा पक्षी आहे. त्याच्या नावाप्रमाणेच (बी-इटर) ज्या ठिकाणी खाण्याची सोय आहे तेथे तो राहातो.

किडे खाणे त्याला आवडते. मार्च ते जून या काळात हे पक्षी घरटे बनवतात. याचे घरटे अतिशय सुंदर असते. नदीच्या किनार्‍यावर शांत निर्जन कोपर्‍यात मातीच्या किंवा वाळूच्या आत घर बनवतो. या पक्ष्यांची घरे एखाद्या कॉलनीच्या स्वरूपात वसलेली असतात. यांची घरे पुढून अरूंद आणि मागच्या भागात जेथे अंडी घातली जातात तेथे रूंद असतात. एका वेळी मादी पाच ते सात अंडी देते. अंडय़ांचा रंग एकदम पांढरा असतो. नर आणि मादी दोघं मिळून घर बनवतात, अंडी उबवतात आणि आपल्या पिल्लांना खाऊ घालतात, तसेच मुलांना उडणे शिकवतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi