Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ईश्वराचा साक्षात्कार

ईश्वराचा साक्षात्कार
रामकृष्ण परमहंस आपल्या भक्तांसमोर प्रवचन देत होते. ते म्हणत होते, हे पाहा, तुमच्यासमोर मी बसलेलो आहे, हे तुम्ही पाहता. पण मी एखादे वस्त्र माझ्यासमोर धरले, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तथापि, पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याजवळ आहे. कपड्याआड असल्याने तुमच्या दृष्टीस मात्र पडू शकणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने अदृश्य होईन. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या-माझ्या सर्वाच्या जवळ असतो. परंतु अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर लहानसा कापडाचा तुकडा जरी धरला, तरी समोरचा मोठा पर्वत दृष्टीला अगोचर होईल.
 
तात्पर्य- अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही, तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपणाला होणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi