बगळे अणि हंसाचा एक संवाद दिला आहे.
ज्यांना मांगल्याची, उदात्ततेची महती कळत नाही, अशांच्या स्वभावाचे दर्शन त्या कथेतून होते.
बगळा विचारतो, ‘तू कोण आहेस?’
हंस म्हणतो, ‘ज्याचे नेत्र, मुख आणि पाय लाल आहेत असा मी हंस आहे.’
पुढचा प्रश्न, ‘तू कोठून आलास?’
हंस म्हणतो, ‘मानस सरोवरातून.’ बगळा म्हणतो, ‘तेथे का आहे?’
हंस म्हणतो, ‘सोनेरी कमळाचं वन आणि अमृतासारखं गोड पाणी आहे. त्याशिवाय रत्नांचे ढीग, पोवळी आहेत.’ बगळला हे सारे वैभव, ही सारी रत्ने यांची नावेही माहीत नसतात.
तो म्हणतो, ‘हे सारं खरं असेलही. पण तिकडं जिवाणूंनी भरलेल शिंपल्यांचं शेत आहे का?’ हंसाने नकार देताच बगळा हसू लागतो.
तात्पर्य : गाढवाला गुळाची चव काय?