Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मांजरींच्या वादात माकडाची मजा

मांजरींच्या वादात माकडाची मजा
एका गावात दोन मांजरी राहत होत्या. त्यांच्यात आपसात खूप प्रेम होतं. जे काही खायला मिळायचं ते आपसात वाटून घ्यायच्या. एका दिवशी त्यांना पोळी सापडली. ती वाटताना त्यांच्यात भांडणं व्हायला लागली. एका मांजरीला आपला पोळीचा तुकडा दुसर्‍या मांजरीपेक्षा लहान वाटत होता पण दुसर्‍या मांजरीला तसं वाटतं नव्हत.
 
जेव्हा त्या दोघींमध्ये वाद वाढायला लागला तर त्यांनी माकडाकडे जाऊन याचा निकाल लावायचा विचार केला. त्यांची तक्रार ऐकून माकड एक तराजू घेऊन आला आणि त्याने दोन्ही तुकडे वेगवेगळ्या पारड्यात ठेवून दिले. तोलताना जो पारडा भारी व्हायचा माकड त्यातून पोळीचा लहानसा तुकडा तोडून तोंडात टाकून घ्यायचा. या प्रकारे माकड कधी या बाजूची तर कधी त्याबाजूची पोळी जास्त आहे असे सांगून पोळीचे तुकडे आपल्या तोंडात टाकत राहिला.
 
दोघी मांजरी गुपचुप माकडाच्या निकालाची वाट पाहत होत्या. पण शेवटी जेव्हा मांजरींना दिसू लागले की पोळीचे अगदी लहान- लहान तुकडेच शिल्लक राहिले आहे तर त्या माकडाला म्हणायला- जाऊन दे, तू काळजी करू नकोस, आम्ही आपसात वाटून घ्यू. यावर माकड म्हणे- बरं, पण या सगळ्यात जो माझा वेळ आणि मेहनत वाया गेली त्याची तुम्हाला किंमत तर मोजावी लागेल. हे म्हणत माकडाने उरलेले दोन तुकडेही आपल्या तोंडात टाकून घेतले आणि मांजरींना तेथून पळवून लावले.
 
या प्रकरणानंतर मांजरींना आपली चूक लक्षात आली आणि त्यांना समजले की आपसात भांडण करणे चुकीचे आहे, अश्या प्रसंगाचा दुसरे लोकं फायदा उचलू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi