Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुपरमॅन झाला 75 वर्षांचा

सुपरमॅन झाला 75 वर्षांचा

वेबदुनिया

WD
स्पायडरमॅन, शक्तिमान याप्रमाणेच सुपरमॅनही तुमचा आवडता असेल. हे अचाटशक्ती आणि क्षमता असलेले बलाढय़ पुरूष आपल्याला कॉमिक्स आणि चित्रपटातून भेटत असतात. ते खरे नाहीत हे माहीत असूनही आपण त्यांच्या कार्यानं प्रभावित होतो. सुपरमॅननंही आपल्याला असंच प्रभावित केलंय. नुकताच हा सुपरमॅन 75 वर्षाचा झालाय. सर्वप्रथम 1930 मध्ये लेखक जेरी सेगर आणि चित्रकार जू शुते यांनी सुपरमॅनला अँक्शन कॉमिक्समध्ये उतरवलं. त्यानंतर तो मोठा झाला आणि भरपूर प्रसिद्धी मिळवली. या पात्राला कॉमिक्समधील कॉर्टुनमध्ये, टेलिव्हिजनवर त्याचप्रमाणे चित्रपटाच्या मोठय़ा पडद्यावर प्रसिद्ध केलं आहे. हे पात्र पत्रकार आहे. 75 वर्षाचा होऊनदेखील त्याची ताकद कमी झालेली नाही, उलट अजूनही वाढतेच आहे.

हा सुपरमॅन उंच इमारतींवर उडय़ा मारतो. अनेक अशक्य करामती करून दाखवतो आणि अडचणीत सापडलेल्यांना मदत करतो. पण सुरूवातीला तो असा नव्हता बरं. सुरूवातीच्या कॉमिक्समध्ये तो अतिशय साधासुधा रंगवला गेला होता. तो तब्येतीनं किरकोळ होता. पळणं तर दूर, त्याला मैलभर चालताही येत नसे. पण 1941 च्या सुमारास प्रकाशित झालेल्या कार्टुनमध्ये तो सशक्त झाला आणि चक्क उडू शकला. सुपरमॅनकडे असाधारण शक्ती आहे. तो आवाजही बदलू शकतो. वेगवेगळी रूपं घेऊ शकतो. त्याची अँक्टिंगही छान आहे. तो वेश बदलतो आणि त्याप्रमाणे बॉडीलॅंग्वेजही बदलतो. म्हणूनच तो बच्चेकंपनीचा लाडका आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi