Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अकबर बिरबल कथा - मेणाचा सिंह

अकबर बिरबल कथा - मेणाचा सिंह
, सोमवार, 4 जानेवारी 2021 (13:34 IST)
बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा राजा एकमेकांना संदेश देण्यासाठी संदेशासह कोडे देखील पाठवत होते. अशाच एका राजाचा संदेशवाहक हिवाळ्यात मुघल सम्राट अकबराच्या दरबारात येतो. तो आपल्यासह कोडेच्या रूपात एक पिंजरा घेऊन येतो. त्यामध्ये एक सिंहाला बंदी बनवून ठेवले होते. त्याच्या सह एक संदेश होता . त्या मध्ये लिहिलेले होते की मुघल राज्यात आहे का कोणी असे हुशार आणि बुद्धिमान जो हात न लावता या सिंहाला पिंजऱ्या मधून बाहेर काढेल? 
 
आता सम्राट अकबराला प्रश्न पडला की अखेर सिंहाला पिंजऱ्यातून हात न लावता काढायचे तरी कसे आणि संदेशात लिहिले आहे की माणसाला एकदाच संधी मिळेल.

अकबर अस्वस्थ झाले त्यांना वाटले की हे काम तर खूपच अवघड आहे आणि कोणी हे करू शकले नाही तर मुघल साम्राज्याची बदनामी होईल. असा विचार करून त्यांनी आपल्या दरबाऱ्यातील सर्व जमलेल्या मंडळींना विचारले - की आहे का कोणी जो हे कोडे सोडवेल ? पण प्रत्येक जण हाच विचार करीत होता की हात न लावता सिंहाला बाहेर काढणे अशक्य आहे. कोणीच त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. त्यांना अशा वेळी बिरबलाची आठवण येत होती जे सभेत नव्हते. त्यांनी सेवकाला पाठवून बिरबलाला बोलविले पण बिरबल एखाद्या काम निमित्ताने राज्यातून बाहेर गेले होते. रात्रभर अकबर विचार करीत होते की हे कोडे कसे सुटेल. 
 
दुसऱ्या दिवशी दरबारात बिरबलाचे स्थान रिक्त बघून त्यांनी जमलेल्या लोकांना विचारले की आहे का कोणा कडे सिंहाला बाहेर काढण्याची युक्ती. तेवढ्यात एक द्वारपाल पिंजऱ्या जवळ आला आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याला यश मिळाले नाही. नंतर एका जादूगाराला बोलविले तो ही यशस्वी झाला नाही. 
 
प्रयत्न करता -करता संध्याकाळ झाली, बिरबल दरबारात आले आणि त्यांनी अकबराला चिंतीत बघून विचारले -' महाराज काय झाले आपण काळजीत दिसत आहात काय झाले?' तेव्हा अकबरांनी बिरबलाला त्या कोड्या बद्दल सांगितले. आणि विचारले की आपण काढू शकता का? 
 
बिरबल म्हणे होय, मी प्रयत्न करेन. अकबर आनंदी झाले त्यांना माहित होते की हे काम बिरबलच करू शकतात. कारण त्यांच्या साम्राज्यात बिरबलापेक्षा अधिक बुद्धिमान कोणीच नव्हते. 
 
बिरबल सिंहाच्या पिंजऱ्या जवळ गेले आणि त्यांनी अकबराला दोन तापविलेल्या सळया देण्याची विनवणी केली एक सेवक तापवलेल्या सळया घेऊन आला आणि बिरबलाला दिली. बिरबलाने पिंजऱ्याला स्पर्श न करता त्याला सिंहाच्या वर ठेवून दिले. सिंह गरम सळया लागतातच वितळू लागला आणि बघता-बघता संपूर्ण वितळून गेला आणि मेणाच्या रूपात पिंजऱ्यातून बाहेर आला.
 
बिरबलाच्या चातुर्याला बघून अकबर आनंदी झाले आणि त्यांनी बिरबलाला विचारले की 'आपल्याला कसे समजले की हा सिंह मेणाचा आहे.'

बिरबलाने उत्तर दिले की मी सिंहाला लक्ष देऊन बघितल्यावर समजण्यात आले की हा सिंह मेणाचा असावा आणि राजाने हे देखील कोड्यात सांगितले नव्हते की हा सिंह बाहेर कसा काढायचा आहे, म्हणून  मी त्याला वितळवून बाहेर काढले. इथे दरबारात बिरबलाच्या नावाचा जयघोष होऊ लागला. आणि संदेशवाहक आपल्या राज्यात परतला आणि त्याने घडलेले आपल्या राजाला सांगितले. असे म्हणतात की त्या दिवसा पासून राजाने कोडे पाठवणे बंद केले. 
 
तात्पर्य : बुद्धिमत्तेने सगळे काही शक्य आहे. प्रत्येक जागी बळाचा नव्हे तर बुद्धीचाही वापर केला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयुर्वेदानुसार, अश्या प्रकारे केसांची निगा राखा