Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रंगीत कोल्हा

रंगीत कोल्हा
, गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (12:01 IST)
एकदा एक कोल्हा जंगलात एका जुन्या झाडाच्या खाली उभा असतो. एकाएकी ते जुनं झाड त्याच्या वर पडत आणि तो घायाळ होतो. कसा बसा तो त्या झाडातून वाचतो आणि आपल्या गुहेत येतो. 
 
तो घायाळ झालेल्या मुळे खूपच अशक्त झालेला असतो. त्यामुळे तो हालचाल करण्याच्या स्थितीतच नसतो म्हणून त्यावर उपासमार करण्याची पाळी येते. एकदा शिकार करण्याचा विचार करत तो आपल्या गुहेच्या बाहेर पडतो. त्याला एक ससा दिसतो तो त्याला पकडायला जातो पण अशक्त झाल्यामुळे तो ससा त्याच्या हातातून निसटून जातो. एकदा हरीण पकडायला जातो तर तो देखील त्याचा हातातून निसटून जातो. 
 
तो विचार करतो की असं तर मी उपाशीच मरेन. असा विचार करून तो ज्या जंगलाच्या जवळ असलेल्या माणसांच्या वस्तीत जातो की तिथे काही तरी खायला मिळेल. पण त्याला बघून त्या वस्तीतील कुत्री त्याचा मागे लागतात. कसाबसा तो आपला जीव वाचवून पळ काढतो आणि पळता- पळता रंगकाऱ्यांच्या एका पिंपात जाऊन पडतो आणि हिरव्या रंगाने माखला जातो. त्यामधून बाहेर पडल्यावर त्याला बघून कुत्री घाबरतात आणि पळून आपले प्राण वाचवतात. 

त्याला एक युक्ती सुचते. तो तसेच आपल्या जंगलात येतो. त्याला बघून सर्व जंगलातील प्राणी घाबरतात. तो एका दगडावर जाऊन जोरात ओरडतो की आज पासून मी तुमचा राजा आहे. मला देवाने पाठविले आहे.जर तुम्ही माझे म्हणणे ऐकले नाही तर मी तुम्हाला शिक्षा देईन.साधे भोळे भाबडे प्राणी त्याच्या गोष्टी वर विश्वास ठेवतात आणि त्याची सेवा करू लागतात. कोणी फळे आणून देतो. तर कोणी त्याच्या साठी शिकार आणतात. एकंदरीत त्याचे आयुष्य छानच चालले होते. 
 
एके दिवशी पूर्ण चंद्र असताना तो आपल्या गुहेत बसला होता. तेवढ्यात इतर कोल्हे बाहेर येऊन ओरडू लागले हू हू हू अशी आवाज काढू लागले. कोल्ह्याने त्यांचे ओरडणे ऐकले आणि स्वतःला रोखू शकला नाही आणि बाहेर येऊन तो देखील त्यांच्या स्वरात स्वर देऊ लागला आणि हू हू हू करू लागला. तो हे विसरलाच की त्याने स्वाँग धरले आहे. त्याला ओरडताना सिंहाने बघितले आणि त्याला ओळखले. त्याने सर्व प्राण्यांना सांगितले की  हा तर लबाड कोल्हा आहे. जो आपल्याला फसवत आहे. सर्वानी मिळून त्याला बेदम मारले आणि त्याला त्याच्या खोट्यापणाने वागण्याची शिक्षा दिली.
 
तात्पर्य : खोटं फार काळ लपून राहत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरोग्यवर्धक खजूर शिरा