rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शांत आणि निर्द्वेषी राहण्याचे गुपित

Eknath sant katha
एकदा संत एकनाथांना एका व्यक्तीने दोन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता त्या व्यक्तीच्या स्वत:च्या भविष्याबध्दल आणि दुसरा प्रश्न होता की महाराज आपण स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात?
 
या प्रश्नावर एकनाथ हसले आणि म्हणाले काही दिवसाने याचे उत्तर देईन. काही काळ लोटल्यावर तो गृहस्थ पुन्हा त्यांना भेटायला आला तेव्हा एकनाथांनी त्याला म्हटले: तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस.
हे ऐकत्याक्षणी तो गृहस्थ स्तब्ध झाला. तो बधिर मनाने तिथून निघू लागला. त्या दरम्यानच त्याच्या मनात आले की जगलो तर एकनाथा संतांच्या सदिच्छेने जगू. ती त्याने सार्थ केली आणि नवव्या दिवशी एकनाथांच्या दर्शनाला आला. हात जोडून म्हणाला: तुमच्या कृपेने वाचलो.
 
त्यावर एकनाथ म्हणाले: आता मी तुमच्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. पण त्या आधी हे सांगा की गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात?
 
गृहस्थ म्हणाला, हे आठ दिवस अगदी छान, शांत गेले. मरणाच्या भितीने मी खूप बेचैन होतो, पण या कारणामुळेच दुसर्‍यावर राग काढण्याचे एकदाही मनात आले नाही. कुटुंबातील लोकांशीही प्रेमाने वागलो. कोणाशी भांडण नाही तंटा नाही. कुणी चुकलं तरी त्याला माफ करण्याची प्रवृत्ती होती कारण हे दिवस अखेरचे आहे सतत हे मनात असायचं. म्हणून कुणालाही दुखावयाचे नाही हे ठरवले होते. सगळ्यांचे देणे चुकवले आणि घेणे माफ केले कारण आयुष्य नाही तर वैभवाचे काय करणार अर्थातच या आठ दिवसात कमावली ती शांती.
 
यावर एकनाथ म्हणाले: हेच तुझ्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदैव वावरतो. म्हणूनच मी नेहमी शांत आणि निर्द्वेषी असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करिअर शिफ्ट करताना महत्तवाच्या गोष्टी ?