Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बोध कथा : ऐक्याची शक्ती

बोध कथा : ऐक्याची शक्ती
, बुधवार, 20 जानेवारी 2021 (22:00 IST)
एका जंगलात एक पारधी पक्षी पकडण्यासाठी गेला. त्याने पक्षींना पकडण्यासाठी एक जाळं पसरवून त्यावर तांदुळाचे दाणे टाकून ठेवले आणि स्वतः एका झाडाच्या मागे लपून बसला. तेवढ्यातच वरून कबुतरांचा कळप जात असताना त्यांना तांदळाचे दाणे पडलेले दिसले. त्यांच्या तोंडाला पाणी आल, एवढे तांदळाचे दाणे बघून ते दाणे खाण्यासाठी उतरू लागले. त्या कळपात एक बुद्धिमान कबुतर होता त्याने विचार केला की या जंगलात एवढे दाणे आलें तरी कुठून कोणी फसवणूक तर केली नसेल? असा विचार करून त्याने त्यांना खाली उतरण्यास नाही सांगितले, पण त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही आणि ते उतरून दाणे खाऊ लागले. अशा प्रकारे सर्व कबुतर त्या पारधीच्या जाळ्यात अडकून गेले. सर्वांनी उडण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. ते सगळे कबुतर घाबरले. त्या बुद्धिमान कबुतराने म्हटले की मित्रांनो घाबरू नका. जर आपण आपले पूर्ण सामर्थ्य लावून या जाळासह उडालो तर या जाळ्या पासून आपली सुटका होऊ शकते अन्यथा तो पारधी आपल्याला मारून टाकेल. त्याचे म्हणणे ऐकून सर्व एकजोर लावून त्या जाळ्यासह उडाले. त्यांना उडताना बघून पारधी त्यांचा मागे पाठलाग करत गेला पण तो जास्त लांब जाऊ शकला नाही आणि हारून बसून गेला. कबुतर ते जाळं घेऊन आपले मित्र मूषकराज कडे जाऊन त्याच्या मदतीने जाळ्यातून बाहेर निघण्यास यशस्वी झाले. अशा प्रकारे ऐक्याच्या बळावर त्यांनी त्या पारधीच्या कैदेमध्ये जाण्यापासून स्वतःला वाचविले. 
 
तात्पर्य : ऐक्यातच सामर्थ्य आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चविष्ट इडली बर्गर रेसिपी