Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Guru Nanak Jayanti 2024: नानक देव आणि कुष्ठरोगीची गोष्ट

Guru Nanak Jayanti 2024: नानक देव आणि कुष्ठरोगीची गोष्ट
, सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 (20:30 IST)
Guru Nanak Jayanti Story: एकदा श्री गुरु नानक देव जी जगाचा उद्धार करण्यासाठी निघाले व एका गावाच्या बाहेर आले. व पाहिले की तिथे एक झोपडी होती. त्या झोपडीमध्ये एक व्यक्ती राहायचा ज्याला कुष्ठ रोग झालेला होता. 
 
गावातील सर्व लोक त्याचा तिरस्कार करायचे. कोणीही त्याच्याजवळ जायचे नाही. एक दिवस नानक देव जी त्याच्याजवळ गेले व त्याला म्हणाले की, दादा मी आम्ही आज तुझ्या झोपडीमध्ये राहू इच्छित आहे. जर तुला काही समस्या नसेल तर आम्ही इथे राहू का? आता कुष्ठरोगी आश्चर्यचकित झाला कारण कोणीही त्याच्या जवळ येऊ जायचे नाही. मग त्याच्या घरात राहणे कोणी कसे मान्य केले? कुष्ठरोगी त्याच्या आजारामुळे इतका दु:खी झाला होता की त्याला इच्छा असूनही काही बोलता येत नव्हते. फक्त गुरुजींकडे पाहत राहिले. तसेच पाहता पाहता त्याच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागले पण त्याला बोलता येत न्हवते. 
 
गुरुजींनी त्या कुष्ठरोगी रबाब वाजवायला सांगितले आणि गुरुजी झोपडीत बसले आणि कीर्तन करू लागले. कुष्ठरोगी लक्षपूर्वक कीर्तन ऐकत राहिला. आता कीर्तन संपल्यानंतर कुष्ठरोगीचे हात दुमडले गेले पण त्याला नीट हालचाल करता आली नाही. त्याने गुरुजींच्या चरणी मस्तक टेकवले.
 
गुरुजी म्हणाले तू ठीक आहेस ना, गावाबाहेर झोपडी का बांधलीस? कुष्ठरोगी म्हणाला, 'मी खूप दुर्दैवी आहे, मला कुष्ठरोग झाला आहे, माझ्याशी कोणी बोलत नाही, माझ्या घरच्यांनीही मला घराबाहेर काढले आहे. मी वाईट आहे. म्हणूनच माझ्या जवळ कोणी येत नाही.
 
त्याचे म्हणणे ऐकून नानक देवजी म्हणाले, 'वाईट ते लोक आहेत ज्यांनी तुझ्यासारख्या रुग्णावर दया दाखवली नाही आणि एकटे सोडले.'
 
माझ्याकडे ये, मला बघू दे. तुझा कुष्ठरोग कुठे आहे? गुरुजींनी हे शब्द सांगताच कुष्ठरोगी गुरुजींच्या जवळ आला आणि देवाची कृपा झाली की कुष्ठरोगी पूर्णपणे बरा झाला. ते पाहून तो गुरुजींच्या पाया पडला. गुरुजींनी त्याला उचलून मिठी मारली आणि म्हणाले की, 'देवाचे स्मरण करा आणि लोकांची सेवा करा, हे मानवी जीवनाचे मुख्य कार्य आहे.'

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मसालेदार भरली वांगी रेसिपी