बिरबलाचा दरबारात जाण्याचा तो पहिलाच दिवस होता. दरबाराचे थोडे-फार काम झाल्यावर बादशाहाने बिरबलाला विचारले, '' बिरबल, तुमच्या हिंदू लोकांची दिवाळी जितक्या आनंदाने येते, तितक्याच आनंदाने ती निघून जाते का?''
बिरबल : होय महाराज.
बादशाहा : कशावरून म्हणतोस ?
बिरबल : आणि म्हणून तर ती पुढील वर्षी न चुकता अगदी वेळेवर येते ना ? जर ती आनंदाने गेली नसती, तर ती पुन्हा परत आली असती का?
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा