बिरबलाला घाबरवून टाकावे, या उद्देशाने बादशहाने एकदा आपण भयंकर भडकलो आहोत, असा खोटाच आव आणीत तो बिरबलाला वाटेल तसे बोलू लागला. परंतु आपल्या बोलण्याने घाबरून न जाता उलट बिरबल मोठमोठ्याने रडायला लागल्याचे पाहून अचंबित झालेला बादशहा त्याला म्हणाला -
''बिरबल, अरे, मी इतका भडकलो असता तू भीती वाटून थरथर कापशील, असे मला वाटले होते, उलट त्याऐवजी हल काढून तू का रडायला लागलास ? ''
बादशहाने असे विचारताच त्याला एका बाजूला नेऊन बिरबल म्हणाला, ''महाराज, माझा कसलाही अपराध नसताना तुम्ही माझ्यावर एवढे भडकलात की, मला असे वाटते की तुमच्या डोक्यात काही तरी फरक झाला. साहजिकच 'आता आपल्या राज्याचे आणि प्रजेचे कसे होणार?' या काळजीने माझा शोक अनावर झाला'' बिरबलाच्या या उत्तरावर बादशहा फारच खजील झाला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा