Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वताची कथा

श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वताची कथा
, बुधवार, 11 डिसेंबर 2024 (20:30 IST)
Kids Story : गोकुळ निवासी देवराज इंद्रला खूप घाबरायचे. त्यांना वाटायचे की, देवराज इंद्र सृष्टीवर पाऊस पडतात. नगरीतील सर्व नागरिक इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी खूप पूजा करत असत. जेणेकरून भगवान इंद्राचा आशीर्वाद गोकुळावर राहील. तसेच एकदा श्रीकृष्णाने गोकुळातील लोकांना समजावून सांगितले की, भगवान इंद्राची पूजा करण्यात आपला वेळ वाया घालवण्याऐवजी गायी आणि म्हशींची पूजा करणे चांगले आहे. ते तुम्हाला दूध देतात. तसेच प्राण्यांना माया लावावी. 
 
गोकुळवासी यांना श्रीकृष्णचे म्हणणे पटले व त्यांनी इंद्रदेवाच्या जागी प्राण्यांना मानसन्मान देण्यास सुरवात केली. इंद्रदेवाने बघितले की आता आपली कोणी पूजा करत नाही, तेव्हा या अपमानाने त्यांना धक्का बसला. तसेच इंद्रदेव संतापले आणि त्यांनी गोकुळातील लोकांना धडा शिकवण्याचे ठरवले. आता भगवान इंद्राने ढगांना गोकुळ नगरी बुडेपर्यंत पाऊस पाडण्याचा आदेश दिला. भगवान इंद्राची आज्ञा मिळाल्यानंतर गोकुळ नगरीवर जोरदार पाऊस पडू लागला. 
 
गोकुळात असा पाऊस कधीही पडला न्हवता. चारही दिशांना पाणी साचले. गोकुळात पुर आला. गोकुळवासी घाबरून श्रीकृष्णजवळ पोहचले. श्री कृष्ण ने सर्वांना आपल्या मागे येण्याचे आदेश दिले.  गोकुळवासी आपल्या गायी आणि इतर प्राणी घेऊन श्रीकृष्णच्या मागे गेले. श्री कृष्ण गोवर्धन नावाच्या पर्वताजवळ पोहचले. व गोवर्धन पर्वत श्रीकृष्णने आपल्या हाताच्या करंगळीवर उचलला. सर्व गोकुळनिवासी पार्वतीच्या खाली आश्रयास आले. श्री कृष्ण यांचा हा चमत्कार पाहून इंद्रदेव भयभीत झाले व त्यांनी पाऊस थांबवला आणि श्रीकृष्णाची माफी मागितली. आता पाऊस थांबला म्हणून गोकुळनिवासी आनंदित झाले. व आपल्या घरी परत गेले. अशा प्रकारे श्रीकृष्णाने आपल्या सामर्थ्याने गोकुळवासीयांचे प्राण वाचवले.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दत्त जयंती विशेष रेसिपी : दत्तगुरूंना आवडणारी घेवड्याची भाजी