Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Essay On Cow : 'गायी'वर निबंध

Essay On Cow : 'गायी'वर निबंध
, बुधवार, 31 मे 2017 (16:20 IST)
भरतामध्ये हिंदू धर्मात लोक गायीला "गाय हमारी माता है"च्या रूपात तिची पूजा करतात. ती आम्हाला दूध देते जे फारच फायदेशीर आणि पौष्टिक असत. हा पशू जगात सर्व भागांमध्ये आढळून येतो. आम्ही आमचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी रोज गायीचे दूध पितो. गायीचे दूध नवजात बालकांसाठी चांगले व पचनशील असत. गाय स्वभावाने फारच सरळ पशू आहे. हिला चार पाय, एक लांब शेपूट, दोन सिंग, दोन कान, एक तोंड, एक मोठी नाक आणि डोकं असत. ही मादा पशू आहे जी सकाळ व संध्याकाळ दोन वेळा दूध देते. काही गायी त्यांचा आहार आणि क्षमतेनुसार दिवसातून तीनवेळा देखील दूध देतात. हिंदू धर्मात गायीला आईच्या रूपात मानले गेले आहे आणि आम्ही तिला गाऊ माताच्या नावाने बोलावतो. हिंदू लोक गायीचा फार सन्मान आणि पूजा करतात. गायीचे दूध पूजा व अभिषेक करताना कामात घेतो.  
 
गाय 12 महिन्यानंतर एक लहान वासरूला जन्म देते. गाय आपल्या वासरूला चालणे आणि धावणे शिकवत नाही ते जन्मानंतर स्वत:च चालू आणि धावू लागत. वासरू काही महिन्यांपर्यंत तिचे दूध पितो नंतर गायीसारखे जेवण करणे सुरू करतो. गाय सर्व हिंदूंसाठी एक पवित्र पशू आहे.  
webdunia
गाय वेग वेगळ्या आकाराची आणि रंगांची असते. ही भोजन, तृणधान्ये, हिरवा गवत, चारा आणि इतर खाद्य पदार्थांचा सेवन करते. पण गायीला शेतात हिरवी गवत चारणे जास्त आवडते. जगभरात गायीच्या दुधाने बरेच पदार्थ तयार करण्यात येतात. जसे दही, ताक, पनीर, तूप, लोणी, मिठाई, मावा आणि बरेच काही.  
 
हिचे शेण झाड, मनुष्य आणि इतर प्रयोजनांसाठी फारच उपयोगी आहे. हे एक पवित्र वस्तूच्या रूपात मानले गेले आहे आणि हिंदू धर्मात  पूजा आणि कथा करताना याचा वापर केला जातो. गोमूत्र मुळे बरेच आजार दूर होतात.  
 
आम्हा सर्वांनी आमच्या जीवनात गायीचे महत्त्व आणि आवश्यकतेला ओळखून हिचा सन्मान करायला पाहिजे. आम्हाला गायीला कधीपण दुखवायला नाही पाहिजे आणि तिला योग्य वेळेवर भोजन आणि पाणी द्यायला पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रवासादरम्यान 44 टक्के लोकं असतात तणावात