Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

वडील आणि मुलाची गोष्ट : माझ्या मुर्त्या परिपूर्ण आहेत...

bal katha
, सोमवार, 12 जुलै 2021 (15:09 IST)
गावात एक शिल्पकार असायचा, तो खूप सुंदर शिल्पे तयार करायचा. आणि त्या कामातून तो चांगली कमाई करायचा, त्याला एक मुलगा होता, तो मूल लहानपणापासूनच मूर्ती बनवू लागला. मुलगाही खूप चांगल्या मूर्ती तयार करायचा आणि मुलाच्या यशावर वडील आनंदी झाले. पण प्रत्येक वेळी तो त्याच्या मूर्तींमध्ये काही कमतरता काढायचा,
 
तो म्हणायचा, " खूप छान केले, पण पुढच्या वेळी या चुकिला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करशील.", मुलाने देखील तक्रार केली नाही, त्याने आपल्या वडिलांच्या सल्ल्याचे पालन केले आणि मूर्ती पुढे सुधारत राहला.
 
सतत सुधारणामुळे मुलाच्या मूर्ती वडिलांपेक्षा चांगली होऊ लागल्या आणि अशी वेळही आली, लोक पुष्कळ पैसे देऊन मुलाच्या मूर्ती विकत घेऊ लागले, तर वडिलांच्या मूर्ती त्याच्या आधीच्या किंमतीला विकत राहिल्या. वडील अजूनही मुलाच्या मूर्तींमध्ये कमतरता शोधायचा.
 
पण मुलालाही ते आवडत नव्हत, तो काही न बोलता त्या चूका सुधारत असे. वेळ अशीही आली की मुलाच्या संयमाचा प्रतिसाद झाला, जेव्हा वडील चूका काढत होते तेव्हा मुलगा म्हणाला, "तुम्ही असे म्हणता की तुम्ही खूप मोठे शिल्पकार आहात,"
 
"जर तुमच्याकडे इतकी समज असती तर तुमच्या मूर्ती इतक्या कमी किंमतीला विकल्या नसत्या, मला तुमच्या सल्ला देण्याची गरज नाही आहे, माझ्या मुर्त्या परिपूर्ण आहेत."
 
वडिलांनी मुलाचा आवाज ऐकला आणि वडिलांनी मुलाला सल्ला देण्याचे, मूर्तीमधील चुका काढने सोडले. काही महिने मुलगा आनंदी होता, परंतु नंतर त्याने हे पाहिले की लोक त्याच्या मूर्तींबद्दल पूर्वीपेक्षा जास्त कौतुक करीत नाहीत.
 
आणि त्याच्या मूर्तींच्या किंमतीही वाढणे थांबले. सुरुवातीला मुलाला काहीही समजले नाही, परंतु नंतर तो वडिलांकडे गेला, समस्येबद्दल त्यांना सांगितले, वडिलांनी शांतपणे मुलाचे ऐकले, जणू त्यांना आधीपासून माहित होत की एखाद्या दिवसाला असे होणार आहे. 
 
मुलगा विचारतो, "हे घडणार आहे हे तुला ठाऊक होते काय?" वडिल म्हणाले "हो, कारण बर्‍याच वर्षांपूर्वी मी देखील या परिस्थितीला सामोरे गेलो होतो", मुलाने विचारले, "मग तुम्ही मला का समजावल का नहीं?" वडिलांनी उत्तर दिले "कारण तुला समजून घ्यायचे नव्हते."
 
"मला माहित आहे की मी तुझ्यासारखी छान मूर्ति बनवित नाही, कदाचित माझा सल्ला मूर्तींबद्दल चुक असेल, असे पण नहीं आहे की माझ्या सल्ल्याने तुझ्या मुर्त्या अधिक छान झाल्या आहेत, परंतु जेव्हा मी तुझ्या मूर्तींमध्ये कमतरता काढायचो तेव्हा तू तुझ्या मूर्तींवर समाधान नहीं व्हायचा."
 
"तू स्वत: ला सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि हेच यशाचे कारण होते. परंतु ज्या दिवशी तू तुझ्या कामावर समाधानी झाला आणि तू हे स्वीकारले की हे काम आणखी सुधारित करण्यास वाव नाही, तुझी वाढ देखील थांबली."
 
"लोक तुझ्याकडून नेहमीच चांगल्या गोष्टींची अपेक्षा करतात आणि म्हणूनच तुझ्या मूर्तींबद्दल तुझी प्रशंसा केली जात नाही आहे किंवा तुला त्यांच्याकडून जास्त पैसे मिळत आहे."
 
मुलगा थोडा वेळ शांत बसला आणि मग विचारले, "मी काय करावे?" वडिलांनी एका ओळीत उत्तर दिले, "असमाधानी व्हायला शिकून घे, अस समझ की तू तुझ्या कामामध्ये अधिक चांगला होवू शकतो, ही एक गोष्ट आहे जी तूला पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरणा देईल, तूला नेहमीच उत्कृष्ट बनवेल."
 
तात्पर्य  :-   यावरून ही शिक्षा मिळते की, आपल्या कार्यावर कधीही समाधानी होऊ नका. ज्या दिवशी आपण आपल्या कामावर समाधानी झालो त्या दिवशी आपली वाढ थांबेल.

- Social Media

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गरुड ; बाज के बच्चे मुंडेरो पर नहीं उड़ते