Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पौराणिक कथा : सीतेचा स्वयंवर

Kids story
, मंगळवार, 3 जून 2025 (20:30 IST)
Kids story : मिथिलाचा राजा जनक याने आपली सुंदर कन्या सीतेच्या लग्नासाठी एका भव्य स्वयंवराचे आयोजन केले होते. तसेच या स्वयंवरात दूरदूरचे राजे आणि राजपुत्र उपस्थित झाले होते. पण सर्वांसाठी एक पण होता... तो पण असा होता. भगवान शिवांचे विशाल धनुष्य उचलून त्याला दोरी बांधायची. व त्यांच्यापैकी सर्वोत्तम वर सीतेला निवडायचा होतो. राजा जनकाने ते विशाल मजबूत धनुष्य दाखवले आणि घोषणा केली की सीतेचा विवाह त्याच्याशी होईल जो या मजबूत शिवधनुष्याची दोरी ओढण्यात यशस्वी होईल.
ALSO READ: पौराणिक कथा : भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदामाला तिन्ही लोकांचे स्वामी बनवले
आता अनेक राजपुत्रांनी प्रयत्न केले पण सर्व अपयशी ठरले. कोणीही ते धनुष्य हलवू शकले नाही. तसेच  त्या स्वयंवरात रावण देखील उपस्थित होता. पण तो हे कार्य करू शकला नाही. तसेच तिथे प्रभू राम आणि लक्ष्मणही तिथे उपस्थित होते. आता सर्वांच्या नजरा श्रीरामाकडे वळल्या. आता श्रीराम समोर आले आणि धनुष्याला नमस्कार केला. व सहजपणे शिवधनुष्य उचलले आणि त्याला दोरी बंधारणार तेवढ्यात कडकड असा आवाज आला आणि त्या शिव धनुष्याचे मधून दोन तुकडे झाले. राजा जनकाला खूप आनंद झाला. श्रीरामावर फुलांचा वर्षाव झाला. तिन्ही लोकांनी श्रीरामावर फुलांचा वर्षाव केला. मिथिला नगरी आनंदाने भरून गेली. आता सीता मताने समोर येऊन प्रभू श्रीरामाच्या गळ्यात हार घातला. व सर्वांनी फुलांचा वर्षाव केला.
ALSO READ: पौराणिक कथा : शनिदेवांच्या जन्माची मनोरंजक कथा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गिधाड हा पक्षी किती शक्तिशाली आहे? जो माउंट एव्हरेस्टपेक्षा उंच उडतो; जाणून घ्या