Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंचतंत्र कहाणी : मांजरीचा न्याय

Cat
, मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (20:30 IST)
एका घनदाट जंगलामध्ये एक विशाल वृक्षावर कपिंजल नावाचा तितर पक्षी राहायचा. एक दिवस कपिंजल आपल्या साथीदारांसोबत दूर शेतांमध्ये धान्य आणावयास गेला. अनेक रात्रीनंतर त्या वृक्षाच्या खाली बिळात एक ’शीघ्रगो’ नावाचा ससा शिरला. व तो तिथेच राहू लागला. 
 
आता झाले काय तर काही दिवसांनी कपिंजल परत आला. धान्य खाल्यामुळे तो धष्टपुष्ट झाला होता.  त्याने पहिले की आपल्या जागेवर एक ससा येऊन बसला आहे. त्याने सस्याला आपली जागा रिकामी  करून मागितली.ससा खूप अहंकारी होता. म्हणाला,"हे घर आता तुझे नाही. सरोवर, विहीर, तलाव आणि वृक्षांवरील घरांचा हा नियम आहे की, जो इथे आश्रयास येईल तो इथेच राहील व घर बांधेल. आता दोघांमध्ये वाद व्हायला लागला. त्यांचे खूप मोठ्याने भांडण सुरु झाले. शेवटी कपिंजल ने एका तिसऱ्याला याचा निर्णय घेण्यास सांगितले. त्यांचा हा वाद एक जंगली मांजर पाहत होती. तिने विचार केला मीच नाय देते किती छान होईल. दोघांना ठार करून भोजन करता येईल आता मांजर मोठी धूर्त होती. 
 
हा विचार करून मांजरीने एक युक्ती केली, ती नदीच्या किनाऱ्यावर गेली व हातात माळा घेतल्या व सूर्याकडे पाहत आसन टाकून बसली. व धर्माचा उपदेश करायला लागली. तिचा धर्मोपदेश ऐकून ससा म्हणाला की, "हे पहा तपस्वी बसले आहे. यांना आपण न्याय करण्यास सांगूया. कपिंजल तीतर मांजरीला पाहून घाबरला. व दुरूनच म्हणाला "मुनिवर तुम्ही आमचे हे भांडण सोडवा आणि योग्य न्याय करा.  व जयचा पक्ष जिसका पक्ष धर्म-विरुद्ध असेल तुम्ही त्याला खाऊन टाकावे. 
 
आता हे ऐकून मांजरीने डोळे उघडले,व म्हणाली "राम-राम अस बोलू नका. मी शिकार करणे सोडले आहे.  मी धर्म-विरोधी पक्षाची देखील शिकार करणार नाही. पण मी न्याय नक्की करेल. आता धूर्त मांजर परत म्हणाली की मी म्हातारी आहे मला ऐकू येत नाही आहे, जवळ येऊन बोला. मांजरीच्या बोलण्यावर दोघांना विश्वास बसला. दोन्ही तिच्याजवळ गेले. धूर्त मांजरीने एका झटक्यात दोघांना ठार केले. कपिंजल तितर आणि  ’शीघ्रगो’ससा दोघांना आपला जीव गमवावा लागला. 
तात्पर्य : विचार न करीत कोणावरही पटकन विश्वास ठेऊन नये. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरीच बनवा रेस्टॉरंट सारखी बटर गार्लिक नान