रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर श्रीरामाने त्या सर्वांना भेटवस्तू दिल्या ज्यांनी युद्धात त्यांना मदत केली होती. जेव्हा श्रीरामाने हनुमानाला विचारले की त्यांना काय हवे आहे तर त्यांनी कुठलीही भेटवस्तूसाठी नकार दिला. हे बघून सीता मातेने प्रसन्न होऊन हनुमानाला आपल्या मोत्यांची माळ दिली. हनुमानाने ती भेट स्वीकार केली.
हनुमान मोत्याची माळ घेऊन दरबारात एका कोपर्यात जाऊन बसून गेले. नंतर ते माळेतून एक-एक मोती काढून आपल्या दातांनी तोडू लागले. हे बघून हैराण सीतेने त्यांना विचारले की असे कृत्य करण्यामागील नेमकं कारण तरी काय? तेव्हा हनुमानाने उत्तर दिलं की की मोत्यांमध्ये श्रीराम शोधत आहे परंतू आतापर्यंत एकाही मोतीमध्ये प्रभू दिसले नाही.
त्यांची ही गोष्ट ऐकून सभेतील सर्व लोक हसू लागले आणि त्यापैकी एकाने हनुमानाला विचारले की हे हनुमंत! जर आपल्या शरीरात देखील श्रीराम वास करत असतील तर? उत्तरदाखल हनुमानाने जय श्रीराम म्हणत आपलं हृद्य चिरुन दाखवलं आणि हृद्यात रामाची प्रतिमूर्ती दिसून आली. यावर तेथे उपस्थित सर्व हनुमानाच्या भक्तीवर नमन करु लागले.