एकदा एक शिकारी शिकार करण्यासाठी अरण्यात जातो. त्याला तिथे बराच काळ होतो पण शिकार काही सापडत नाही. तो कंटाळून एका झाडाखाली विसावा घेतो. झाडाच्या खाली त्याला थकल्यामुळे लगेच झोप लागते. त्याच्या तोंडावर झाडाच्या झुडप्यातून
मंद-मंद ऊन येत असतं. तिथून एक हंस जात असतो. तो शिकार्याकडे बघतो की कसा शांत निजलेला आहे पण त्याच्या तोंडावर ऊन येतं आहे असे दिसतं. तो त्याच झाडाचा फांदीवर बसून त्याच्यावर येत असलेले ऊन रोखण्यासाठी स्वतःचे पंख
खोलून बसतो आणि त्याला सावली देतो.
तेवढ्यात तिथे एक कावळा येतो आणि त्या शिकारीला त्रास देण्याच्या उद्देशाने हंसाजवळच त्याच फांदीवर येऊन बसतो. कावळा शिकार्याच्या तोंडावर विष्ठा करून उडून जातो. हंस हे सगळे बघतो तरी ही डोळे मिटून
तिथेच बसून असतो. शिकारी ऐकाऐक जागा होतो आणि झाड्यांच्या फांदीवर हंसाला बसलेला बघतो. त्याला वाटते की त्यानेच विष्ठा केलेली असून निमूटपणे डोळे मिटून बसला आहे. तो काहीही विचार ना करता धनुष्याच्या बाणाने त्याला ठार मारतो.
मरत-मरत हंस त्याला म्हणतो "की मी तर तुला सावली देत होतो आणि ज्या कावळ्याने विष्ठा केली तो तर उडून गेला. मग तू मला का मारलंस." यावर शिकारी उत्तरला
तुला माहीत होते की त्या कावळ्याने विष्ठा केली आहे तरी तू का इथेच बसून राहिला? त्याची शिक्षा तुला भोगावी लागली. त्या दुष्ट कावळ्यामुळे तुला तुझे प्राण द्यावे लागले. तुला पण त्याच क्षणी उडून जायला हवे होते. तुमच्या मनात जी भावना
होती ती चांगली होती पण ही वेळ चुकीची असल्यामुळे तुला प्राण गमवावे लागले.
बोध: कुठले ही कार्य करताना त्याचा सातत्याने विचार केला गेला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. मनाने आणि कृतीने जे हंस आहे त्यांनी कावळ्यारूपी दुष्ट लोकांना आपल्या पासून दूर ठेवले पाहिजे.