Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हंस आणि मूर्ख कासव

हंस आणि मूर्ख कासव
, गुरूवार, 11 मार्च 2021 (09:30 IST)
एका जंगलाच्या मधोमध एक तलाव होत, सर्व प्राणी त्या तलावावर येऊन पाणी पीत असायचे. त्या तलावात एक कासव राहायचा.त्यांना खूप बोलायची सवय होती.त्याला गप्प राहणे माहीतच न्हवते.म्हणून त्या जंगलातील सर्व प्राण्यांनी त्याचे नाव बडबड्या कासव असे ठेवले होते. त्या तलावात राहणारे दोन हंस त्या कासवाचे मित्र होते. जे नेहमी त्याला योग्य सल्ला देत होते. कारण ते दोघे त्याचे शुभ चिंतक असे. 
एकदा कडक उन्हाळ्यात तलावाचे पाणी कोरडे पडू लागले. सर्व प्राणी पाण्यासाठी तळमळू लागले. हे बघून त्या हंसाला आपल्या मित्राची म्हणजे कासवाची काळजी वाटू लागली . त्यांनी आपल्या मित्राला म्हटले की "मित्रा आता या तलावाचे पाणी कमी होत आहे. त्या मुळे आता तुला हे तलाव सोडून इतरत्र जायला पाहिजे. 
या वर त्या कासवाने म्हटले " मित्रा मी हे तलाव सोडून अजून कुठे जाऊ आणि इथे तर जवळ कोणतेही तलाव नाही. ते हंस आपल्या मित्रासाठी काळजीत होते त्यामुळे त्यांनी या मधून काही मार्ग  काढण्याचा विचार केला. त्यांना एक युक्ती सुचली .
त्यांनी आपल्या कासव मित्राला म्हटले ' की मित्रा आम्ही एक काठी घेऊन येतो आणि ती काठी दोन्ही बाजूने तोंडात धरून ठेवू आणि तू ती काठी मधून आपल्या तोंडात धरून घे. असं करून आम्ही तुला एखाद्या सुरक्षित जागेवर घेऊन जाऊ. त्या ठिकाणी देखील एक तलाव आहे आणि त्या तलावाचे पाणी कधीच कोरडे होत नाही .कासव त्यांच्या मताशी सहमत झाला आणि हंसासह जाण्यासाठी तयार झाला. त्या हंसांनी त्याला ताकीद दिली की त्याने वाटेमध्ये काहीच बोलायचे नाही. जे बोलायचे असेल ते त्या तलावाच्या ठिकाणी गेल्यावरच  बोलायचे.   
 
कासवाने काठी तोंडात धरली आणि ते हंस कासवाला घेऊन उडू लागले. ते उडता उडता एक गावावरून निघाले. त्या गावात काही लोक बसले होते. त्यांनी हे सर्व प्रथमच बघितले होते. त्यांना तिघांना बघून ते गावकरी टाळी वाजवू लागले. कासव कडून धीर धरला गेला नाही आणि त्यांनी खाली हे काय चालले आहे असं म्हणत जसच आपले तोंड उघडले. त्याच क्षणी त्याच्या तोंडातून काठी सुटली आणि तो उंचावरून खाली पडून मरतो. हंस खेदजनक पणे तिथून निघून जातात. 
 
शिकवण : विना कारण व्यर्थ काहीच बोलू नये. असं केल्याने आपल्याला तोटा संभवतो
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फॅशन- 45 प्लस असाल तर भारतीय पोशाखात आपली वेगळी स्टाईल दाखवा