Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेनालीराम कहाणी आवडती मिठाई

तेनालीराम कहाणी आवडती मिठाई
, गुरूवार, 18 मार्च 2021 (09:20 IST)
तेनालीराम नेहमी आपल्या उत्तर देण्याच्या विशिष्ट शैली साठी ओळखले जायचे.त्यांना कोणतेही प्रश्न विचारले की ते नेहमी त्याचे उत्तर एका वेगळ्या शैलीत द्यायचे.मग तो प्रश्न त्यांच्या आवडत्या मिठाईबद्दल असो.
एकदा त्यांनी आपल्या आवडत्या मिठाई खाण्यासाठी देखील  राजा कृष्णदेव राय याना परिश्रम करायला लावले. 

एकदा हिवाळ्यात दुपारी महाराज कृष्णदेव राय, राजपुरोहित आणि तेनालीराम सह बागेत फिरत होते. महाराज म्हणाले-' थंडी खूप पडली आहे. हा हंगाम तर खूप खाण्याचा आणि आपले आरोग्य चांगले ठेवण्याचा आहे. 'राज पुरोहित म्हणाले ''की होय महाराज आपण योग्य म्हणत आहात, या हंगामात तर सुकेमेवे, फळ, मिठाई खाण्याचा आहे ''
मिठाईचे नाव ऐकून महाराजांनी विचारले ; की या हंगामात कोणती मिठाई जास्त खातात. ?''
 
राज पुरोहित म्हणाले '' या दिवसात तर सुकेमेवे पासून बनलेल्या सर्व मिठाई जसे की काजू कतली, बदामाचा शिरा, अशा अनेक प्रकाराच्या मिठाई खातात. ज्यांना आपण हिवाळयात देखील खाऊ शकतो. हे ऐकून महाराज हसू लागले आणि तेनालीराम ला विचारले '' तेनालीराम आपण सांगा की आपल्याला या पैकी कोणती मिठाई आवडते. ?''
 
या वर तेनाली म्हणाले की महाराज आपण आज रात्री दोघे माझ्या सह चला मी आपल्याला अशी मिठाई खाऊ घालेन जी मला खूप आवडते " आम्हाला सांगा कोणती मिठाई आपल्याला आवडते आम्ही महालात बनवून देऊ .नाही महाराज ती मिठाई कोणाला बनवायला जमणार नाही. आपण माझ्यासह चला मी आपल्याला ती मिठाई खाऊ घालेन. ठीक आहे आम्ही आपल्यासह येऊ असे महाराज म्हणाले "
 
रात्री साधारण वेशात ते तिघे निघाले. तेनाली त्यांना घेऊन एका गावाच्या पलीकडे एका शेतात घेऊन गेला. त्या शेतात तेनालीने एका खाटेवर त्यांना बसविले आणि स्वतः मिठाई घेण्यासाठी गेले. आल्यावर त्यांच्या कडे तीन वाट्या होत्या त्यांनी एक एक वाटी महाराज आणि राजपुरोहिताला दिली आणि एक वाटी स्वतः घेतली. महाराजांनी त्या मिठाई चा आस्वाद घेतल्यावर त्यांच्या तोंडी वाह! च्या व्यतिरिक्त काहीच निघाले नाही. ती मिठाई त्यांना फार आवडली ते म्हणाले की या पूर्वी ही अशी मिठाई आम्ही कधीच खाल्ली नव्हती काय नाव आहे या मिठाईचे .?
तेनाली महाराजांच्या गोष्टीवर हसले आणि म्हणाले की ' महाराज ही मिठाई नसून गूळ आहे. हे ऊसाचे शेत आहे आणि इथे गूळ तयार केला जातो. मला इथे येऊन गूळ खायला आवडते. मला असे वाटते की गरम गूळ देखील कोणत्याही मिठाई पेक्षा कमी नाही."      
 
" बरोबर म्हटले तेनाली आपण आम्हाला एक वाटी अजून मिठाई आणा. "
नंतर त्या तिघानी गूळ खाल्ला आणि महालात परत आले. 
 
शिकवण- या कहाणी पासून शिकवण मिळते की एखाद्या छोट्या-छोट्या गोष्टी देखील आनंद देऊन जातात. जो आनंद पैसे खर्च करून देखील मिळत नाही. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता, बोर खाल्ल्याने आरोग्याच्या तक्रारी जातात