Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाल गणेश आणि कुबेर यांची गोष्ट

balganesh
, बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (13:00 IST)
फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. धनाचे देवता कुबेर यांना खूप अहंकार होता की, ते सर्वात श्रीमंत आहे. एकदा त्यांनी भव्य भंडारा आयोजित केला आणि अनेक देवीदेवतांना आमंत्रित केले. ज्यामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती देखील सहभागी होते.
 
पण काही कारणांमुळे ते येऊ शकले नाही. तसेच भगवान शंकरांना कुबेर जे स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत होते त्यांचा अहंकार तोडण्यासाठी त्यांनी आपला पुत्र बाल गणेश यांना पाठवले. जे अगदी लहान होते.
 
गणेशजी जेवायला बसले. तसेच गणेश यांनी सर्व भोजन खाण्यास सुरुवात केली. व असे करता करता सर्व भोजन संपले.
 
आता तर त्यांनी कुबेर नगरी अलकापुरी मधील सर्व भांडे व इतर वस्तू खाण्यास सुरवात केली. हा सर्व प्रकार पाहून धनाचे देवता कुबेर भयभीत झाले. कारण त्यांना ज्या दौलतीवर ज्या श्रीमंतीवर गर्व होता. तीच श्रीमंती त्यांचे भांडे, इतर मूल्यवान वस्तु बालगणेश आपल्या पोटात समाविष्ट करीत होते. 
 
देवता कुबेर धावतधावत भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या जवळ गेले व मदत मागितली. व भगवान शंकरानी एक वाटी भाजलेले धान्य बाल गणेशाला यांना दिले आणि त्याची अन्नाची भूक लगेच मिटली.  
 
आता देवता कुबेर यांना आपल्या चुकीची जाणीव होऊन त्यांचा अहंकार निवळला. त्यांनी त्यांना झालेल्या अभिमानबद्दल क्षमा मागितली. बालगणेशांनी आपल्या बुद्धीचातुर्याने गर्विष्ठ कुबेर यांचा गर्व मोडला होता. 
 
तात्पर्य : कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व बाळगू नये. कारण गर्वाचे घर हे नेहमी खाली असते. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संथ निळे हे पाणी