Article Marathi Kids Stories %e0%a4%85%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%ad %e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9f%e0%a4%9a 107080700006_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अतिलोभ वाईटच

अतिलोभ वाईटच
NDND
एका गावात चार ब्राह्मण मित्र होते. त्यांची मैत्री अगदी जिवलग होती. पण चौघेहीजण घरातील दारिद्याने कंटाळलेले होते. म्हणून एके दिवशी परदेशी जाऊन द्रव्यप्राप्ती करायचीच असे ठरवून चौघेही घर सोडतात.

बरेच दिवस मार्गक्रमण केल्यावर ते अवंती नामक नागरात येतात. तेथे नदीवर स्नान वगैरे करून देवदर्शन करून शेजारील मठात जातात. तो मठ भैरवानंद नावाच्या योगीपुरुषाचा असतो. त्यास अभिवादन करून चौघे मित्र आपली इच्छा भैरवानंद योग्याकडे व्यक्त करतात, ''आम्ही द्रव्य मिळवण्याच्या इर्ष्येने घरून निघालो. अमानुष सिद्धी प्राप्त करून द्रव्यसंचय करायचीही आमची तयारी आहे. या कामात अपयश आले तरी डगमगणार नाही.''

भैरवानंद योगी त्या मित्रांचा निश्चय बघून आश्चर्यचकित होतो. तो चौघांना एक एक वात हातात देऊन सांगतो की, ''ही वात जेथे पडेल त्या ठिकाणी त्याला धनाचा ठेवा सापडेल!''

webdunia
NDND
त्याप्रमाणे चौघेही वाती घेऊन निघतात. पहिल्याची वात जिथे पडते तिथे तांब्याची खाण मिळते. तो त्यातील थोडे तांबे घेऊन मागे वळतो. दुसर्‍याची वात काही वेळाने पडते तर तिथे चांदीची खाण सापडते. त्यातील चांदी घेऊन दुसरा मित्र स्वगृही जातो. काही वेळाने तिसर्‍याची वात हातातून पडल्याने त्या ठिकाणी सोन्याची खाण मिळते. तेव्हा तो मित्र आपल्या बरोबरच्या मित्राला सांगतो की ''आपले नशीब चांगले उजाडले आहे. आपण आता हे सोने घेऊन घरी जाऊ.'' पण चौथा मित्र सांगतो की, ''तांबे, चांदी, सोने झालं म्हणजे आता रत्नांची खाण हमखास मिळणार. म्हणून मी पुढे जातो.''

''तुझी इच्छा! पण तू रत्ने घेऊन येईपर्यंत आम्ही तुझी वाट बघतोय!'' असे त्याचा दोस्त त्याला सांगतो.

webdunia
NDND
हा पुढे चालल्यावर त्याला एक पुरुष दिसतो. त्याच्या डोक्यावर एक चाक गरगर फिरत असते. त्याचे अंग रक्ताळलेले असते. त्याला बघून हा मित्र घाबरतो. तरी त्या माणसाजवळ जाऊन चौकशी करतो, ''तू कोण आहेस? तुझी ही अवस्था कोणी केली? हे चक्र कसले फिरतेय?''

त्या बरोबर तस चक्र पटकन मित्राच्या डोक्यावर फिरू लागलं. अंगाची लाही लाही होऊ लागली. अंगातून वेदना होऊ लागल्या. हे दृश्य बघून तो पुरुष उद्‍गारतो की, ''तुझ्‍यासारखीच सिद्धी प्राप्त झालेली व्यक्ती हातात वात धरून इथे येईल आणि तु्‍झ्याशी बोलले, तेव्हा हे चक्र त्याच्या डोक्यावर बसेल आणि तुझी सुटका होईल. ज्याप्रमाणे तुझ्यामुळे माझी सुटका झाली. बाबारे हे सर्व नशिबाचे खेळ आहेत!'' असे म्हणून तो पुरुष निघून जातो.

बराच वेळ झाला तरी आपला मित्र येत नाही म्हणून मागे थांबलेला सोबती मित्रास शोधण्यस निघतो, तर त्याला चक्रधारी अवस्थेत अापला दोस्त आढळतो. तेव्हा त्याने आपल्या सोबत्याला अतिलोभामुळे अशी अवस्था आली त्याची हकीगत सांगितली.
मित्रास त्यामुळे वाईट वाटते पण इलाज नसतो.

तात्पर्य : अतिलोभापायी सर्वनाश होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi