एका पाणथळी आणि दलदलीच्या ठिकाणी दोन बेडूक मजेत रहात होते. परंतु त्या वर्षी उन्हाळा खूपच कडक होता. जमीन सुकून कोरडी ठणठणीत जाली होती. त्यामुळे राहायला दुसरी जागा शोधण्यासाठी दोघेही बाहेर पडले. वाटेत त्यांना एक खोल विहीर दिसली. काठावरून त्यांनी विहिरीत डोकावले. विहिरीत भरपूर पाणी होते. आजूबाजूचा परिसरही थंडगार होता. ते पाहून त्यातील उतावळा बेडूक म्हणाला, ''मित्रा, ही विहीर चांगली आहे. चल आपण टाकूया उड्या! त्याला थांबवत दुसरा म्हणाला,
''मित्रा थांब. घाई नको. समजा उडी मारून आपण विहिरीत गेलो आणि या विहिरीचं पाणीही आटून गेलं, तर आपण वर कसे येणार? तेव्हा निर्णय घेण्यापूर्वी आणखी थोडा वेळ विचार करूया. ''
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा