Article Marathi Kids Stories %e0%a4%8b%e2%80%8d%e0%a4%b7%e0%a5%80 %e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf %e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%be 107073000014_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऋ‍षी आणि बहिरीससाणा

ऋ‍षी आणि बहिरीससाणा
Arunmay
एकदा शालंकायन नावाचा ऋषी नदीवर आंघोळीसाठी गेला. त्यावेळी सूर्याला अर्ध्य देत असताना एक बहिरी ससाणा आला आणि उंदरीला उचलून जाऊ लागला. ते बघून ऋषीला वाईट वाटले. ''अरे दुष्टा त्या गरीब उंदरीला सोड'' असे ओरडत ऋषीने त्या बहिरी ससाण्याला एक दगड मारला. त्याबरोबर ससाणा बेशुद्ध होऊन पडला आणि त्यामुळे त्याच्या तोंडातून उंदरी निसटली. त्या उंदरीने ऋषीकडे जाऊन ''मला जीवदान द्या अशी विनंती केली.''

थोड्या वेळात ससाणाही शुद्धीत आला. तो ऋषीकडे येऊन म्हणाला, ''महाराज, तुम्ही मला दगड मारला ही मोठी चूक झाली. माझी उंदरी मला परत द्या नाहीतर तुम्हालाच पाप लागेल.'' ससाण्याच्या उद्‍गारांवर ऋषी उत्तरतो, ''अरे दुष्टा, प्राण्यांचे रक्षण करणे, दुष्टांना शासन करणे, देवाचे स्तवन करणे हा आमचा धर्म. तू मात्र हिंसेलाच तुझा धर्म म्हणवतोस.... मूर्ख कुठला!''

बहिरीससाणा रागाने उत्तरतो, ''महाराज, तुम्हालाच खरा धर्म माहीत नाही. जेव्हा ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली त्याचवेळी त्यांची उपजीविका ही निर्माण केली. आमची उपजीविका उंदीर असल्याने उंदरांची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली. खरं म्हणजे आपल्या सारख्या ऋषीमुनीनी पक्षपात करू नये.! हे ससाण्याचे बोलणे ऐकूण ऋषी रागाने उद्‍गारले, ''मुकाट्याने निघतोस की शाप देऊन भस्म करू.'' तेव्हा तो बहिरीससाणा उडून जातो. नंतर ती उंदरी ऋषीला सांगते की, ''आपण मला वाचवलेत.... पण अजूनही मला दुसरा दुष्ट पक्षी उचलून नेऊ शकतो. म्हणून माझ्यावर दया करा आणि आपल्या आश्रमात घेऊन चला!''

webdunia
WDArunmay
दयाळू असलेला ऋषी उंदरीच्या बोलण्याने गहिवरतो. हिला माणसाच्या रूपात नेलेलं बरं नाहीतर लोक हसतील असा विचार करून तिला छोट्या मुलीचे रूपात आपल्या आश्रमात आणतो. त्याबरोबर ऋषीची बायको मुलीसंबंधी विचारणा करते. तेव्हा ऋषी सगळी हकीकत सांगतो. कालांतराने ही मुलगी मोठी होते, तेव्हा ऋषी वर संशोधनास सुरुवात करतो.

webdunia
WDArunmay
ऋषी सूर्याची निवड भावी पती म्हणून करतो तर मुलगी त्यास नकार देते, ''कारण त्या सूर्याच्या तेजापुढे मी जळून जाईन. त्यापेक्षा चांगला....'' तेव्हा ऋषी मेघाची निवड करतो. तेव्हा मुलगी सांगते, ''हा मलाही झाकून टाकेल त्यामुळे मागमूसही कळणार नाही!'' नंतर ऋषी वायूला बोलावतो पण मुलगी सांगते हा चंचल असल्याने मुळीच नको. नंतर डोंगराला ऋषी बोलावतो. तर नेहमीप्रमाणे ती मुलगी खोड काढते, ''अंग त्याचे फार कठीन आहे.'' शेवटी नाइलाजाने डोंगराला ऋषी विचारतो, ''तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे?'' डोंगर सांगतो, ''आम्ही एवढे टणक असून ही आम्हाला उंदीर पोखरतात. त्यामुळे पायथ्याशी असलेला उंदीरच मला श्रेष्ठ वाटतो.

ऋषीने उंदीराला आमंत्रण दिल्यावर तो येतो. त्याला बघून ती मुलगी खूष होते. त्याबरोबर तिला उंदरीचे रूप देऊन त्या उंदराशी ऋषी लग्न लावून देतो.

तात्पर्य : रूप बदलले तरी मूळ स्वभाव जात नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi