Article Marathi Kids Stories %e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be 108122900035_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुर्‍हाडीचा दांडा

कुर्हाडीचा दांडा
आपण ज्या व्यक्तीला मदत करत आहोत, ती व्यक्ती मदतीच्या लायक आहे किंवा नाही हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर आपण केलेली मदतच आपल्या नाशाला कारणीभूत ठरू शकते, असे रानातील झाडे आपआपसात बोलत होती.      
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एक लाकूड तोड्या आपल्या कुर्‍हाडीचे पाते घेऊन जंगलात गेला आणि तिथल्या झाडांना आपल्या कुर्‍हाडीला दांडा देण्याची त्याने विनंती केली. झाडानेही लाकूड तोड्याची विनंती मान्य करून कुर्‍हाडीला दांडा दिला.

WDWD
कुर्‍हाड तयार होताच तो जोमाने कामाला लागला. एकामागून एक झाडे त्याने आपल्या कुर्‍हाडीने खाली पाडली. त्याचे हे कृत्य पाहून झाडांना फार वाईट वाटले.'' आपणच लाकूडतोड्याला लाकूड देऊन त्याच्या कुर्‍हाडीला दांडा दिला आणि तो लाकूडतोड्या त्याच कुर्‍हाहीने आपल्यालाच कापीत सुटला आहे.'' असे जंगालातील झाडे आपआपसात म्हणत होती. परंतु आता त्याला इलाज नव्हता. झाडांनी दिलेले दान योग्य ठिकाणी दिले गेलेले नव्हते. आता पुढे काय होते एवढेच पाहणे, त्यांच्या हाती शिल्लक होते.

आपण ज्या व्यक्तीला मदत करत आहोत, ती व्यक्ती मदतीच्या लायक आहे किंवा नाही हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर आपण केलेली मदतच आपल्या नाशाला कारणीभूत ठरू शकते, असे रानातील झाडे आपआपसात बोलत होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi