Article Marathi Kids Stories %e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%a8 107102500001_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोरंभचे कारस्थान

गोरंभचे कारस्थान
NDND
वर्धमान शहरातील फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. शहरात दंतिलशेठ नावाचा एक धनाढ्य व्यापारी होता. तो राजाच्याही ज्याप्रमाणे शहरातील गरजू लोकांनाही मदत करी. त्यामुळे राजाही त्याच्यावर खूप खूष होता आणि शहरातील लोकांचेही त्याच्वावर प्रेम होते.

एकदा दंतिलशेठच्या घरी लग्नकार्य होते. त्यावेळी शहरातील सर्व शहरातील लोकांना बोलावून त्यांना भोजनप्रसंगी शेले, पागोटी देऊन सन्मानिक केले जाते. तसेच एके दिवशी त्याने राजाला व राजघराण्यातील लोकांना आमंत्रित केलेले असते. त्या सर्वांना योग्य तर्‍येने सन्मानित केले जाते. पण राजाचा एक खास नोकर असतो. त्याचे नाव गोरंभ असते. हा गोरंभ त्या कार्यक्रमात भलत्याच जागी बसतो. तेव्हा त्यास तेथून उठवण्यास दंतिलशेठला भाग पडेत. गोरंभला शेठने केलेल्या अपमानाचा बदला घ्यावासा वाटतो पण त्याच्या मनात विचार येतो की, ''दंतिलशेठ एवढा श्रीमंत. आपण दरि‍द्री नोकर. आपण कुठे ह्या शेठचा सूड घेणार? पण संधी मिळाली तर माझ्या अपमानाचा बदला मी घेणारच.''

webdunia
NDND
खरोखरच एक दिवस गोरंभला तशी संधी मिळते. त्या दिवशी पहाटे राजाच्या पलंगाजवळ पहारा करण्याची पाळी गोरंभची असते. तेव्हा राजा अर्धवट झोपेत असल्याचे बघून गोरंभ स्वत. डुलकी घेण्याचं सोंग करून बडबडतो, ''काय हा द‍ंतिलशेठ? किती लबाड आहे! राजाशी गोड बोलून राजाचं पद स्तव: हिरावून घेऊ इच्‍छित आहे.''

अचानक कानावर पडलेल्या या वाक्याने राजा झोपेतून खडबडून जागा होतो, आणि गोरंभला विचारतो, ''कायरे... तू आता बडबडलास ते खरं आहे का.?''

आपली युक्ती सफल झाल्याचे लक्षातयेताच गोरंभ खूष होतो पण तसं न दाखवता उत्तरतो, ''महाराज! मला झोपेत बडबडायची सवय आहे. त्यामुळे मी आता काय बोललो ते मलाच आठवत नाही.''

हे ऐकल्यावर राजाचा संशय आणखीनच वाढला, ''ज्याअर्थी हा नोकर कबूल करीत नाही त्याअर्थी त्यात काहीतरी सत्यच असणार!''

दुसर्‍या दिवसापासून राजाने दंतिलशेठशी अबोला धरला. एवढेच नव्हे तर राजवाड्यात येण्याचीही बंदी घालती. इकडे दंतिलशेठ विचारात पडला की आपण राजाचे कधीच काही वाईट केले नाही किंवा चिंतीलेसुद्धा नाही तरीही राजाची मर्जी खप्पा का झाली!

काही दिवसांनी दंतिलशेठ आणि गोरंभची राजवाड्याजवळ भेट झाली. तेव्हा गोरंभने ''कशी जिली'' ह्या अभिवेशात कुत्सितपणे हास्य केले. त्याबरोबर दंतिलशेठच्या लक्षात आले की या राजकारणामागे गोरंभाचेच कारस्तान असणार. त्या दिवशी समारंभात माझ्याकडून अपमानित झालेल्या गोरंभानेच हा उद्योग केला असणार.

webdunia
NDND
दुसर्‍याच दिवशी दंतिलशेठने गोरंभला घरी बोलावून त्याचा योग्य तो सन्मान केला आणि गोरंभची माफी मागितली की, ''गोरंभा, त्या दिवशी माझ्याकडून अपमान झाला त्याबद्दल क्षमा कर. माझ्यावर तुझा जो रोष आहे तो सोडून दे.''

त्याबरोबर गोरंभ खूष होऊन दंतिलशेठ म्हणाला, ''शेठजी, माझा तुमच्यावरचा राग गेला. आता राजाची मर्जी तुम्हाला पुन्हा मिळवून देतो.''

दुसर्‍या दिवशी राजा अर्धवट झोपेत असताना गोरंभ स्वत: झोपेत बडबडण्याचे नाटक करीत बोलतो, ''महाराज शौचाला बसल्यावर फराळ करतात. किती घाणेरडे आहेत महाराज!''

त्याबरोबर राजा खडबडून जागा होत गोरंभवर चिडतो, ''मूर्खा. .. काय बडबडतोस हे, हे कृत्य बघायला तू कधी आला होतास?''

गोरंभ घाबरल्यासारखे दाखवत उत्तरतो, ''महाराज, क्षमा करा.. ... जागरणामुळे मला डुलकी लागली आणि झोपेत काही बडबडलो असेन.''
त्याबरोबर राजानेही विचार केला की जे कृत्य मी कधीच केले नाही ते तो बडबडला त्यावरून दंतिलशेठसंबंधी पण हा उगच बडबडला असणार.
दुसर्‍याच दिवशी राजाने दंतिलशेठला बोलावून घेतले. त्याचा यथोचित सत्कार केला.

तात्पर्य : राजाच्या संबंधित छोट्या किंवा मोठ्या व्यक्तींचा कधी अपमान करू नये नाहीतर प्रसंगी सन्मानास अपात्र ठरवले जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi