Article Marathi Kids Stories %e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af %e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a5%80 %e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af %e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af 108080900008_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

योग्य वेळी योग्य उपाय

सौ. माधुरी सु. दुर्वे

योग्य वेळी योग्य उपाय
ND
ही आहे विशाल या विद्यार्थ्याची गोष्ट तो शाळेत जायला टाळाटाळ करायचा. रागावले तरी तो शाळेत जाईना. शाळेत नेऊन बसवले तरी तो तेथून पळून येई. त्याचे आई बाबा त्याला समजावू लागले. तेव्हा जाईल शाळेत असे म्हणून तो विषय तेथेच सोडून दिला. निरुद्योगी विशाल दिवसभर रस्त्यावरील उनाड मुलांशी उनाडक्या करीत खेळत रहायचा. पानी या रस्त्यावरील दादागिरी करणार्‍या गुंडानी, या रिकामटेकड्या मुलाला हेरले आणि हाताशी धरले.

त्यांनी शिकवल्या प्रमाणे त्यांना तो बिडी सिगारेट आणून देवू लागला. तसेच जवळच्या सिनेमागृहातील पिक्चरची तिकीटे ब्लॅकने विकून त्या लोकांना पैसे आणून देऊ लागला. त्यालाही त्याच्यात पैसे मिळू लागले आणि याच पैशातून तो ऐशो आरामाची जिंदगी जगू लागला. रस्त्यावरील पदार्थ उघडे वाघडे खाऊ लागला. तेही व्यसन करू लागला, सिगारेट ओढू लागला. दारू पिऊ लागला आणि अशाच वातावरणात मोठा होऊ लागला. जेव्हा तो 30 वर्षांचा झाला तेव्हा तो पूर्णपणे व्यसनाचा आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्या जीवनाचा अंत ही 30 व्या वर्षीच झाला.

म्हणजेच योग्य वेळी योग वळण न मिळाल्यामुळे विशालने आपले जीवन संपवले.

Share this Story:

Follow Webdunia marathi