Article Marathi Kids Stories %e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%87 %e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%a4%e0%a4%b0 111121300020_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सूर्याला मुले झाली तर....

बाल जगत
ND
एकदा एका उन्हाळ्यात सूर्याचे लग्न लागत होते. लग्नानिमित्त सर्व प्राणी एकत्र जमून मजा करीत होते. आनंदाने नाचत होते. या आनंदाच्या सोहळ्यात बरेच बेडूकही सामील झाले होते. बेडकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, हे एका हुशार व दूरदर्शी बेडकाला आवडले नव्हते. तो दु:खी चेहरा करून एका बाजूला उभा होता. बर्‍याच वेळानंतर एका बेडकाचे त्याच्याकडे लक्ष गेले. तो त्याचा जवळ आला आणि म्हणाला,

''का हो, तुम्ही नाही का या आनंदोत्सवात सामील होत. चला, नाचूया. सूर्याचे लग्न आहे आज. माहिती आहे ना!''

''हो माहिती आहे तर-! तुम्ही आपले मजेत नाचा. पण या लग्नामुळे आपल्यावर मोठं संकट येणार आहे याची तुम्हाला काही कल्पना आहे का? इतर प्राणी नाचताहेत म्हणून तुम्ही नाचा. मूर्ख कुठले!'' बेडूक रागानं ओरडला. त्या बेकाच्या काहीच लक्षात आले नाही, परंतु तो हुशार बेडूक जे बोलला ते त्याने आपल्या नाचणार्‍या मित्रांना जाऊन सांगितले. सर्व बेडूक नाचायचे थांबून विचार करू लागले, सूर्याच्या लग्नामुळे आपल्यावर कोणतं संकट येणार बुवा! परंतु काही केल्या त्यांच्या काहीही लक्षात येत नव्हते. शेवटी ते सर्व त्या हुशार बेडकाभोवती गोळा झाले. हुशार बेडूक काहीही न बोलता शांत बसला होता. शेवटी एक बेडूक म्हणाला, ''मित्रा, सांग बाबा या लोकांना आपल्यावर कोणतं संकट येणार आहे.

हुशार बेडूक गंभीर चेहर्‍याने जागेवरून उठला आणि म्हणाला, मित्रानो, खरोखरीच तुम्ही भोळेभाबडे आहात. सूर्याच्या लग्नाचा तुम्ही आनंद व्यक्त केलात. परंतु या लग्नामुळे आपल्यावर कोणते संकट येणार आहे हे मात्र तुमच्या लक्षात येत नाही. अहो, हा एक सूर्य उन्हाळ्यात आपली सर्व डबकी कोरडक्ष ठणठणीत पाडतो.

उद्या या सूर्याला त्यासराखीच तेजस्वी मूलं होतील, मग आपलं काय? आपल्या डबक्यांना हिवाळ्यात तरी पाणी राहील का? आपले हालहाल होतील. कदाचित या पृथ्वीवर आपले अस्तित्वच राहणार नाही. म्हणूनच मी दु:खी आहे.'' हुशार बेडकाचे भाषण ऐकून सर्व बेडकांनीच आपल्या तोंडावर हात ठेवले. म्हणजे सूर्याचे लग्न आपल्या दु:खाला कारण ठरणार तर-! आणि आपण मात्र आनंदाने नाचलो-! आपआपसात पुटपुटत सर्व बेडूक जवळ्याच डबक्यात निघून गेले.


Share this Story:

Follow Webdunia marathi