Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किचन टिप्स : हे नक्की करून पाहा

किचन टिप्स : हे नक्की करून पाहा
साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो.
 
पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो.
 
गरम तव्यावर थालिपीठ थापता येत नाही. म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालिपीठ तव्यावर टाकावे.
 
सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत.
 
बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते.
 
स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा. यामुळे आग पटकन विझते.
 
कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi