Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्रीजमध्ये नाही ठेवू या वस्तू

फ्रीजमध्ये नाही ठेवू या वस्तू
बाजारातून फळं किंवा भाजी आणल्याबरोबर ती फ्रीजमध्ये ठेवण्यात येते. तरीही ती ताजी राहण्याऐवजी दोन दिवसात सुरकुतून जाते. असं होत असताना कधी आपण याकडे लक्ष दिले आहे का की कोणत्या वस्तू फ्रीजमध्ये  ठेवायला नको ज्याने त्या फ्रेश राहतील.
 
केळी: केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यावर काळसर चट्टे पडतात. केळीच्या दांडीतून निघणारी इथाईलीन गॅस जवळपासच्या फळांनाही लवकर पिकवते. केळी बाहेरच ठेवावी. आणि फ्रीजमध्ये ठेवायचीचं असेल तर केळीच्या देठांवर प्लास्टिक चढवून ठेवावी. याने केळी आणि जवळपासचे फळंदेखील फ्रेश राहतील.



 

कांदा: काही लोकांना वाटतं की कांदा फ्रीजमध्ये न ठेवण्याचं कारण त्यातून येणारी गंध आहे. पण खरं पाहिलं तर कांदा ओलावा सहन करू शकत नाही त्यामुळे तो फ्रीजमध्ये खराब व्हायला लागतो. म्हणूनच कांदा अंधारी जागी ठेवायला हवा पण याला बटाट्यांजवळ ठेवू नये.

webdunia

 
 

ऍपल: ऍपल फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर कागदात गुंडाळून फळांसाठी असलेल्या शेल्फमध्येच ठेवावे. मोठ्या बिया असलेले फळदेखील फ्रीजमध्ये ठेवू नये. कमी तापमानामुळे यातील एंजाइम सक्रिय होतात आणि फळं लवकर पिकतात.

webdunia

लिंबू: आम्लीय फळं जसे लिंबू आणि संत्रं फ्रीजचा गारवा सहन नाही करू पात. गारव्यामुळे यांच्या सालांवर डाग पडतात आणि स्वादही बिघडतो. फ्रीजमध्ये ठेवल्याने या फळांचा रस वाळायला लागतो.

webdunia

टोमॅटो: बहुतेक लोकं टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवण्याची चूक करतात. टोमॅटो उन्हात वाढणारं फळ आहे. हो खरंच! टोमॅटो भाजी नसून फळ आहे आणि याला खूप पाणी आणि उन्हाची गरज असते. गारव्यात याची व्यवस्थित वाढ होत नाही म्हणूनच फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे लगेच खराब होऊ लागतात.

webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi