Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वयंपाकात नका करू या चुका

स्वयंपाकात नका करू या चुका
* भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकू नाही. हे पाणी भाजीत किंवा कणीक मळताना ही वापरता येते. उकळून न घेता हे यांना वाफेवर ही शिजवू शकता. 
 
भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नये. यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात. म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत. वेळेच अभाव असल्यास फळे, भाज्या आधीच कापून ठेवाच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा.
 
webdunia
* कढईत एखादा पदार्थ बनवताना त्यावर नेहमी झाकण ठेवावे. असं केल्याने पदार्थ लवकर शिजतो आणि त्यातील पौष्टिक तत्त्वही नष्ट होत नाही.
 
* तळण झाल्यावर उरलेले तेल दुसर्‍या पदार्थासाठी वापरण्याची सवय अगदी सामान्य आहे. पण ही पद्धत चुकीची आणि आरोग्यास हानिकारक आहे. उरलेले तेल पुन्हा उकळल्याने त्यातील चरबी वाढते आणि लठ्ठपणा, रक्तदाब आणि हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता असते.
webdunia
* फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ जसे दूध, क्रीम, बटर, अंडी, उरलेलं अन्न व इतर पदार्थांना काढल्यावर ताबडतोब गरम करू नये. पदार्थ वापरण्याआधी अर्धा तास बाहेर काढून ठेवावे. 
 
* मायक्रोव्हेवमध्ये जेवण बनवताना प्लास्टिक कंटेनरचा वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्याऐवजी मायक्रोसेफ ग्लास बाऊलचा वापर करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi